February 21, 2025 3:22 PM February 21, 2025 3:22 PM
13
शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातल्या समभागांमध्ये घसरण
गेल्या काही आठवड्यात शेअर बाजारात स्मॉल कॅप आणि मिड कॅप क्षेत्रातल्या समभागांमध्ये घसरण झाली आहे. त्यावर नियामक म्हणून काहीही प्रतिक्रिया देण्याची गरज नसल्याचं मत सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी व्यक्त केलं आहे. मुंबईत काल म्युच्युअल फंडांच्या संघटनेच्या परिषदेत त्या बोलत होत्या.