व्यवसाय

April 17, 2025 7:36 PM

views 81

देशातल्या शेअर बाजारात तेजी

देशातले शेअर बाजार आजही जोरदार तेजी नोंदवून बंद झाली. सेन्सेक्स १ हजार ५०९ अंकांनी वधारुन ७८ हजार ५५३ अंकांवर विसावला. निफ्टी ४१४ अंकांची वाढ नोंदवून २३ हजार ८५२ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टीही सुमारे पावणे बाराशे अंकांची वाढ नोंदवून ५४ हजार २९० वर बंद झाला. हा निर्देशांक उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ ...

April 16, 2025 3:36 PM

views 20

जीईएमकडून १ लाख ३० हजार कोटी जणांना विमा

जीईएम अर्थात गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेसने २०२४-२५ या आर्थिक वर्षात १ लाख ३० हजार कोटी जणांचा आरोग्य विमा, आयुर्विमा आणि अपघात विमा उतरवला अशी माहिती वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाने दिली आहे. या वर्षात जीईएमने १० लाख रोजगार दिल्याचंही मंत्रालयानं सांगितलं आहे. जीईएम ग्राहकांना एक सुरक्षित आणि फायदे...

April 16, 2025 3:34 PM

views 28

देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ

देशाच्या वस्तू आणि सेवा निर्यातीत साडेपाच टक्के वाढ नोंदली गेली आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या काळात भारताने ८२० अब्ज ९३ कोटी डॉलर्स किमतीचा माल निर्यात केला. त्याआधीच्या आर्थिक वर्षात निर्यात झालेल्या मालाचं मूल्य ७७८ अब्ज १३ कोटी डॉलर्स होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातर्फे जाहीर झालेल्या या आक...

April 15, 2025 8:59 PM

views 40

शेअर बाजारात जोरदार तेजी

अमेरिकेनं अतिरीक्त आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळं आजही देशातले शेअर बाजार जोरदार तेजीत होते. सेन्सेक्स आज तब्बल १ हजार ५७८ अंकांनी वधारुन ७६ हजार ७३५ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०० अंकांची वाढ नोंदवून २३ हजार ३२९ अंकांवर बंद झाला. यामुळं गुंतवणूकदारांची मालमत्ता सुमारे ११ लाख कोटी...

April 13, 2025 2:17 PM

views 19

देशाच्या परकीय चलन साठ्यात वाढ

भारताच्या परकीय चलन साठ्यात गेल्या आठवड्यात दहा अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळे भारताचा परकीय चलन साठा ६७६ अब्ज डॉलर्सच्या स्तरावर पोहचला आहे. दरम्यान देशाच्या सोन्याच्या साठ्यातही दीड अब्जाहून जास्त वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये रिझर्व्ह बँकेचे स्थान ४ कोटी डॉलर्सने वाढून ४...

April 9, 2025 8:10 PM

views 51

सेबीची ६ सदस्यांची समिती स्थापन

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीचे सदस्य, तसंच अधिकाऱ्यांची मालमत्ता, गुंतवणूक, दायित्व इत्यादींबाबतचे हितसंबंध आणि याबद्दलची माहिती सार्वजनिक करण्यासंदर्भातल्या तरतुदींचा व्यापक आढावा घेऊन शिफारशी करण्यासाठी सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. माजी मुख्य दक्षता आयुक्त प्रत्युष ...

April 8, 2025 8:59 PM

views 33

जगभरातल्या शेअर बाजारात जोरदार तेजी

जगभरातल्या बाजारातली तेजी आणि रिझर्व्ह बँकेकडून उद्या पाव टक्के व्याजदर कपातीची आशा यामुळे देशातल्या शेअर बाजारांनी काल झालेलं निम्मं नुकसान आज भरुन काढलं. तीन दिवसानंतर तेजीत बंद झालेला सेन्सेक्स आज १ हजार ८९ अंकांची वाढ नोंदवून ७४ हजार २२७ अंकांवर बंद झाला. निफ्टी पावणे ४०० अंकांच्या वाढीसह २२ हजा...

April 8, 2025 2:58 PM

views 73

भारतीय रिझर्व्ह बँकेला ग्लोबल फायनान्सचा नवोन्मेषी आर्थिक संस्था पुरस्कार जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड ग्लोबल फायनान्स या अर्थविषयक मासिकाने जागतिक पातळीवर सर्वात नवोन्मेषी आर्थिक संस्था म्हणून केली आहे. आर्थिक क्षेत्रात सातत्यानं नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. कर्जाची प्रक्रिया सुलभ करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या ‘युनिफाईड लेंडिंग इंटरफेस’मुळे हा प...

April 7, 2025 8:41 PM

views 48

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही मोठी घसरण

अमेरिकेनं जाहीर केलेल्या करकपातीमुळं सोनं, चांदीच्या दरातही आज मोठी घसरण झाली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएनशननं दिलेल्या दरांनुसार सोनं सुमारे २ हजार रुपये तोळा आणि चांदी अडीच हजार रुपये किलोनं स्वस्त झाली. त्यामुळं २२ कॅरेट सोनं तोळ्यामागे ८९ हजार ५०० रुपये आणि चांदी किलोमागे ९३ हजार १०० रुपये दर...

April 7, 2025 6:52 PM

views 25

अमेरिकेनं वाढवलेल्या करांमुळं जगभरातल्या शेअर बाजारात हाहाकार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लादलेल्या करांमुळे जगभरातल्या शेअर बाजारांसह भारतीय बाजारातही आज हाहाकार माजला. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले त्यादिवसानंतरची सर्वात मोठी घसरण आज देशातल्या शेअर बाजारांनी नोंदवली. यामुळे देशातल्या गुंतवणूकदारांचं साडे १३ लाख कोट...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.