व्यवसाय

June 12, 2025 7:41 PM June 12, 2025 7:41 PM

views 10

मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समधे ८२३ अंकांची घसरण

जागतिक बाजारातलं कमजोर वातावरण तसंच इराण आणि अमेरिकेत वाढलेल्या तणावामुळे देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ८२३ अंकांनी घसरुन ८१ हजार ६९२ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५३ अंकांची घट नोंदवून २४ हजार ८८८ अंकांवर स्थिरावला. बांधकाम उद्योग, तेल आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, बँका यासह सर्वच क्षेत्...

June 11, 2025 8:35 PM June 11, 2025 8:35 PM

views 19

फसवणूक टाळण्यासाठी सेबी UPI ID सुरू करणार

गुंतवणूकदारांना फसवून त्यांना अनधिकृत बँक खात्यात पैसे जमा करायला लावण्याचे प्रकार टाळण्यासाठी सेबीनं नवीन प्रणाली विकसित केली आहे. यानुसार अधिकृत बँक खात्याची ओळख दर्शवणारे UPI ID सुरू केले जाणार आहेत. शेअर दलालांच्या अधिकृत युपीआय आयडीमध्ये brk तर म्युच्युअल फंडांच्या अधिकृत युपीआय आयडीमध्ये mf अस...

June 6, 2025 8:22 PM June 6, 2025 8:22 PM

views 77

रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात अर्धा टक्के कपात, शेअर बाजारात जोरदार तेजी

रिझर्व्ह बँकेनं आज द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला. पतधोरण समितीनं रेपो दरात अर्धा टक्के कपात केली आहे. आता रेपो दर साडेपाच टक्के झाला आहे. फेब्रुवारीपासून सलग तिसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली असून या कालावधीत रेपो दर एकूण १ टक्क्यानं कमी झाला आहे. चालू आर्थिक वर्षात चलनफुगवट्याचा दर...

June 6, 2025 7:36 PM June 6, 2025 7:36 PM

views 3

शेअर बाजारात रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम

रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीचा जोरदार परिणाम आज शेअर बाजारात दिसून आला. सेन्सेक्स ७४७ अंकांनी वधारुन ८२ हजार १८९ अंकांवर बंद झाला. निफ्टी २५२ अंकांची वाढ नोंदवत २५ हजार ३ अंकांवर स्थिरावला. बँका आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातले समभाग आज तेजीत होते.

June 1, 2025 3:09 PM June 1, 2025 3:09 PM

views 10

व्यावसायिक गॅस सिलिंडर २४ रुपयांनी स्वस्त

देशातल्या १९ किलोच्या व्यावसायिक  गॅस सिलिंडरच्या किंमती २४ रुपयांनी कमी करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी घेतला आहे. आता व्यावसायिक सिलिंडर दिल्लीत १ हजार ७२३ रुपयांना, मुंबईत १ हजार ६७४ रुपये, कोलकाता १ हजार ८२६, चेन्नईत १ हजार ८८१, बंगळुरूत १ हजार ७९६, नोएडा १ हजार ७२३ आणि चंडीगडमधे १ हजार ७४३...

May 30, 2025 7:29 PM May 30, 2025 7:29 PM

views 9

भारताच्या परकीय चलन साठ्यात ६.९ अब्ज डॉलर्सची वाढ

गेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलन साठ्यात ६ पूर्णांक ९ अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून तो ६९२ अब्ज ७० कोटी डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या साप्ताहिक सांख्यिकी पुरवणीत ही माहिती दिली आहे.  गेल्या आठवड्यात, परकीय चलन मालमत्ता ४५० कोटी डॉलर्सनं वाढून ५८६ अब्ज १० कोटी डॉलर्सवर पोचली.  ...

May 30, 2025 7:09 PM May 30, 2025 7:09 PM

views 214

भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5 % राहण्याचा अंदाज

आर्थिक वर्ष २०२४- २५ मधे भारताचा प्रत्यक्ष स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर साडेसहा टक्के राहील, असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागानं व्यक्त केला आहे. या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७ पूर्णांक ४ दशांश टक्के दरानं वाढीचं अनुमान आहे.    या वर्षातल्या एकंदर जीडीपी वाढीचा दर ९ पूर्णांक ८ दश...

May 30, 2025 1:21 PM May 30, 2025 1:21 PM

views 17

वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल – RBI

चालू आर्थिक वर्षात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. सरकारचा भांडवली खर्चावर भर, खासगी क्षेत्राची वाढ, बँका आणि भांडवली बाजारांचा अचूक ताळेबंद यामुळे भारताची अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहिल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. उत्पादन क्षेत्रात च...

May 28, 2025 9:35 AM May 28, 2025 9:35 AM

views 24

देशात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक

देशात गेल्या आर्थिक वर्षात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती १४ टक्के अधिक आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, यापैकी १९ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. तर संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर क्षेत्राला १६ टक्के आणि व्यापार...

May 27, 2025 8:34 PM May 27, 2025 8:34 PM

views 6

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. विवरण पत्र भरण्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात विलंब झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षी ३१ जुलै पर्यंत करदात्यांना परताव्यासाठी विवरणपत्र भरता येतात. मात्र, यंदा १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवल्याच...