वाहनांच्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट-एचएसआरपीच्या नोंदणीसाठी बनावट लिंक तयार करून वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र परिवहन विभागानं एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपर्यंत एचएसआरपी बसवणं बंधनकारक केलं आहे. यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयानं परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर एक लिंक दिली आहे. एचएसआरपी बदलण्यासाठी वाहनधारकांकडून पैसे गोळा करून फसवणूक करण्यासाठी चोरट्यांनी अशा लिंक तयार केल्या आहेत. अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याचं पोलीसांनी सांगितलं.
Site Admin | March 6, 2025 5:48 PM | Cyber crime
वाहनधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
