डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने खटला दाखल केला आहे. परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं.तसंच फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ता बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसदेखील जारी केली आहे.

 

दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर यांना उद्या २० तारखेला पुण्यात जबाब नोंदवण्यासाठी दुसरी नोटीस दिली आहे. त्यांना याआधी नोटीस देऊन काल उपस्थित राहायला सांगितलं होतं, मात्र त्या उपस्थित राहिल्या नव्हत्या.