November 10, 2025 8:37 PM

printer

दिल्लीत मेट्रो स्थानकाबाहेर कार स्फोटात ८ ठार, १५ जखमी

नवी दिल्लीत लाल किल्ला परिसरात आज संध्याकाळी सातच्या सुमाराला एका कारमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ८ जण ठार तर १५ जण जखमी झाल्याचं वृत्त्त आहे. जखमींपैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना लोकनायक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या स्फोटामुळे आजूबाजूच्या गाड्यांचंही नुकसान झालं आहे. ही गाडी लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक १ जवळ उभी होती. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, श्वान पथक, न्यायवैद्यकीय पथक आणि दिल्ली पोलिस दाखल झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप समजलेलं नाही. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.