कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

कारगिल युद्धावेळी अतुलनीय शौर्य दाखवत सर्वोच्च बलिदान देणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देश त्यांना आदरांजली वाहत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॅप्टन बत्रा यांना समाज माध्यमावर आदरांजली वाहिली आहे. कारगिल युद्धा दरम्यान कॅप्टन बत्रा यांनी दाखवलेलं शौर्य आणि बलिदान हे देशसेवेतलं एक गौरवशाली उदाहरण असल्याचं ते आपल्या संदेशात म्हटलं आहे. 

 

१९९९मध्ये झालेल्या कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा यांनी नेतृत्व करत शत्रुच्या चौक्या काबीज केल्या होत्या. या मोहिमेत देशाच्या सीमेचं रक्षण करताना ते शहीद झाले. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.