डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

May 14, 2025 12:28 PM | Cannes Film Fest

printer

७८ व्या ‘कान चित्रपट महोत्सवाची’ दिमाखदार सुरूवात

अठ्ठ्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाला काल फ्रान्स इथं आकर्षक रेड कार्पेट आणि झगमगाटात प्रारंभ झाला. सुप्रसिद्ध अमेरिकी अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट डी नीरो यांना काल मानद पाल्ने डी या सम्नानानं गौरवण्यात आलं. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजीत रे यांचा १९७० साली प्रदर्शित झालेला अरण्येर दिन रात्री हा चित्रपट क्लासिक संवर्गात दाखवण्यात येईल, यात सौमित्र चॅटर्जी आणि शर्मिला टागोर यांच्या भूमिका आहेत. भारतीय चित्रपट दिद्गर्शक नीरज घायवान यांचा दुसरा चित्रपट होमबाऊंड ला अनसर्टन रिगार्ड या संवर्गासाठी निवडण्यात आलं असून या चित्रपटात इशान खट्टर यांनी भूमिका केलेल्या आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा