July 26, 2025 1:46 PM

printer

केंद्रसरकारकडून देशभरातल्या १० कोटी १८ लाखापेक्षा जास्त महिलांच्या कर्करोगाची तपासणी

आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत केंद्रसरकारने देशभरातल्या १० कोटी १८ लाखापेक्षा जास्त महिलांची सर्व्हायकल कॅन्सर, म्हणजेच, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची तपासणी केली आहे. असंसर्गजन्य आजारांची तपासणी, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी लोकसंख्या-आधारित उपक्रमाचा हा एक भाग असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. 

 

हा उपक्रम ३० ते ६५ वर्ष वयोगटातल्या महिलांवर लक्ष केंद्रित करत असून, कर्करोगाचं निदान करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये चाचणी केली जाते.  ही कामगिरी आयुष्मान आरोग्य मंदिरांच्या माध्यमातून व्यापक आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरवण्या-प्रति सरकारची वचनबद्धता दर्शवत असल्याचं आरोग्य मंत्रालयानं  म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.