कॅनडाच्या हिंद प्रशांत धोरणाचा भाग म्हणून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आजपासून १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर येत आहेत. भारत दौऱ्यामध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. तसंच कॅनडा आणि भारत दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि आर्थिक संधींना चालना देणाऱ्या कॅनडा आणि भारत देशांमधील व्यावसायिकांशी मुंबईत संवाद साधतील.