कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारत-कॅनडा द्विपक्षीय भागीदारीला नवीन गती देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांसाठी ही भेट महत्त्वाची असल्याची भावना प्रधानमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करताना व्यक्त केली. व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, शेती आणि सामाजिक संबंधांमध्ये दोन्ही देशांमधल्या वाढत्या सहकार्याचं महत्त्व देखील मोदी यांनी अधोरेखित केलं. या भेटीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या भेटीसाठी उत्सुक असल्याचं म्हणत शुभेच्छा दिल्या.
Site Admin | October 13, 2025 8:18 PM | Canadian FM Anita Anand | PM Narendra Modi
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली प्रधानंमत्री मोदींची भेट