कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कॅर्नी यांनी टॅरिफ विरोधी राजकीय जाहिरातीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून ऑन्टेरियोचे प्रमुख ड्युग फोर्ड यांना जाहिरातीचे प्रक्षेपण न करण्याची सूचना केली आहे. आपण ट्रम्प यांच्याकडे खासगीत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती कॅर्नी यांनी दक्षिण कोरियात आज आशिया पॅसिफिक बैठकीनंतर वार्ताहरांना दिली. १६ ऑक्टोबरला ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर सर्व व्यापारी वाटाघाटी बंद करून कॅनडातून होणाऱ्या आयातीवर अतिरिक्त १० टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली होती.
Site Admin | November 1, 2025 8:10 PM | Canada | US
कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त