डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कॅनडाकडून ‘बिश्नोई समूह’ दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध

कॅनडाने बिश्नोई समूहाला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध केले आहे. या कारवाईमुळे, कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी संचालनालयामार्फत या गटाची मालमत्ता, वाहने, संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे समूहाला होणारा वित्तपुरवठा, प्रवास आणि नवी भरती यांसंदर्भातल्या दहशतवादी गुन्ह्यांवर कारवाई करता येणार आहे. विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या या समूहाकडून खंडणी वसूल करणे आणि धमकी देत दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे होत असल्याचं कनडानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.