कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी सहा वाजता न्यूफाऊंडलँड आणि लॅब्रॉडर इथं मतदान सुरू झालं.
उद्या सकाळी साडे आठ वाजेपर्यंत ब्रिटिश कोलंबिया इथं शेवटच्या टप्प्यातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अमेरिकेने लादलेलं आयात शुल्क हा यंदाच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.