डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जम्मू आणि काश्मीर आणि हरयाणात प्रचारसभा

जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला आपल्या मुलांसाठी शांतता, उज्वल भवितव्य हवं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू इथं प्रचारसभेत बोलत होते. विधानसभा निवडणुकांसाठी गेल्या दोन टप्प्यात प्रचंड प्रमाणावर झालेलं मतदान याची साक्ष असल्याचं ते म्हणाले. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्यांचा काँग्रेस कधीही आदर करू शकत नाही असा दावा त्यांनी केली. २०१६ मध्ये आजच्याच दिवशी भारतानं सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला नामोहरम केल्याची आठवण मोदी यांनी यावेळी केली. 

हरयाणात हिसार इथंही आज प्रधानमंत्र्यांची सभा झाली. काँग्रेसनं दलित आणि मागासवर्गीयांसाठी आपले दरवाजे पूर्ण बंद करून घेतल्याचा आरोप मोदी यांनी केला. काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यात कधीही स्थिरता येत नाही. हरयाणात जनतेचा विचार करण्याऐवजी अंतर्गत वर्चस्वासाठी कलह सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.