डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये NPPचे नेते अनुरा कुमार दिसनायके यांनी आघाडी मिळवली असली, तरी दिसनायके आणि SLPPचे नेते नमल राजपक्षे यांच्यात ५० टक्के मते मिळवण्याची चढाओढ कायम असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत एनपीपीला केवळ ३ टक्के मते मिळाली होती. 

या निवडणुकीसाठी ३८ उमेदवार रिंगणात आहेत, यात एकाही महिला उमेदवाराचा समावेश नाही. 

निवडणुकीच्या रणधुमाळीतच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं श्रीलंकेतल्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. तिथे सुरु असलेल्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. यानंतरचा आढावा निवडणुकीनंतर नवं सरकार स्थापन झाल्यावर घेतला जाईल असंही नाणेनिधीनं स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.