बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याबरोबर दुसऱ्या टप्प्याच्या प्रचारालाही वेग आला आहे. एनडीए आणि महाआघाडी, या दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ नेते आणि स्टार प्रचारक आज विविध ठिकाणी निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत.
प्रचारादरम्यान, कायदा आणि सुव्यवस्था, बेरोजगारी, स्थलांतर, बिहारचा विकास आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. जदयू अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काल एनडीए च्या उमेदवारांसाठी अनेक ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. तर महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी प्रसाद यादव हे देखील आपल्या स्वतःच्या मतदारसंघांसह अनेक मतदारसंघांमध्ये प्रचार सभा घेत आहेत.
दरम्यान, जदयू ने आपल्या माजी मंत्री आणि माजी आमदारांसह ११ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान येत्या ६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.