दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार असताना कोविड काळात आरोग्यासाठी असलेला निधी पूर्ण खर्च झाला नाही, अनेक प्रकल्प प्रलंबित राहिले, दिल्लीतल्या रुग्णालयात औषधं आणि मनुष्यबळाची कमतरता होती, असे निरीक्षण कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिल्ली विधानसभेत हा अहवाल मांडला. केंद्र सरकारनं कोविड काळात दिलेल्या ७८८ कोटी रुपयांपैकी सरकारनं केवळ ५४३ कोटी रुपये वापरले, असं यात म्हटलंय.
Site Admin | February 28, 2025 8:00 PM | CAG Report
‘आप’ पक्षानं कोविड काळात निधी पूर्ण खर्च केला नाही – कॅग अहवाल
