डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 7, 2025 7:57 PM | Pratap sarnaik

printer

मुंबईत रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला तत्वतः मान्यता

मुंबई महानगर क्षेत्रात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला जाईल. तसे निर्देश गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव  वी. उमाशंकर यांना दिले आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. 

 

नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्ली इथं सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकी दरम्यान सरनाईक यांनी गडकरी यांची विशेष भेट घेऊन केबल कार प्रकल्प राबवण्यासाठी केंद्र सरकारच्या “पर्वतमाला परियोजने”अंतर्गत सार्वजनिक खाजगी भागीदारी, अथवा केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त आर्थिक भागिदारीनं रोप वे विकसित करण्याच्या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करण्याची तत्वतः मान्यता घेतल्याचं त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.