केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे २ हजार २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय इटारसी – नागपूर दरम्यान सुमारे साडे ५ हजार कोटी रुपये खर्च करुन चौथा रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडे ६ हजार कोटी रुपये आणि National Cooperative Development Corporation ला २ हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज घेतला.
Site Admin | July 31, 2025 7:15 PM | Cabinet Decision
Cabinet Decision : छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी
