डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आशा, अंगणवाडी स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

महाराष्ट्रात आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपये आणि अपंगत्वासाठी पाच लाख रुपये अनुदान देण्यात येईल. हा निर्णय १ एप्रिल २०२४ पासून लागू करण्यात येईल. याशिवाय राज्य शासनातल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी ३० जून २०१६ पासून पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करण्याचा गट ड ते गट अ च्या पदांमध्ये पदोन्नतीमध्ये ४ टक्के आरक्षण ३० जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येत आहे. याचा लाभ काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत मिळेल.