भुसावळ-वर्धा, गोंदिया-डोंगरगड यासह एकंदर ८९४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यासाठी एकंदर २४ हजार ६३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
भुसावळ आणि वर्धा दरम्यानच्या ३१४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला, तसंच गोंदिया – डोंगरागड या ८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या चौथ्या मार्गिकेला यात मंजुरी मिळाली.
इटारसी – भोपाळ – बिना दरम्यान चौथी मार्गिका, वडोदरा – रतलाम तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.