केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलिंडर मिळावं यासाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १२ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. सध्या या योजनेचे १० कोटी ३३ लाख लाभार्थी आहेत आणि त्यांना कमाल ९ सिलिंडरसाठी प्रति सिलिंडर ३०० रुपयांची सबसिडी दिली जाते. तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांसाठी ४ हजार २०० कोटी रुपये द्यायलाही या बैठकीत मान्यता मिळाली. देशभरातल्या पावणे ३०० संस्थांना यातून मदत दिली जाईल. आसाम आणि त्रिपुरासाठी सव्वा ४ हजार कोटी रुपयांचं विशेष पॅकेज मंत्रीमंडळानं आज मंजूर केलं.
Site Admin | August 9, 2025 2:37 PM | Cabinet Decision
एलपीजी सिलिंडरसाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
