डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

March 28, 2025 9:12 PM | Cabinet Decision

printer

Cabinet Decision : केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांच्या महागाई भत्त्यात वाढ

 

केंद्रसरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना २ टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाटच्या बैठकीत झाला. त्यानुसार आता महागाई भत्ता ५३ टक्क्यावरुन ५५ टक्के होणार आहे. १ जानेवारी- २०२५ पासून ही वाढ लागू होणार आहे. 

 

इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी  इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. 

 

चालू खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांवर अनुदानाच्या दरांनाही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. त्यानुसार डीएपीचं ५० किलो वजनाचं पोतं शेतकऱ्यांना तेराशेपन्नास रुपयांना मिळेल.