डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

December 27, 2024 7:38 PM | Manmohan Singh

printer

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संसदेत आदरांजली

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशानं एक प्रख्यात राजकारणी, ख्यातनाम अर्थतज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज संसदेत शोक ठराव पारित करण्यात आला आणि दोन मिनिटांचं  मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. मनमोहनसिंग यांनी देशावर  आपली छाप सोडल्याचं यात म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केलं. देशात आर्थिक सुधारणांचं  सर्वसमावेशक धोरण राबवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, असं यात म्हटलं आहे.