डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशातल्या २३४ शहरांमधे ७३० एफ एम प्रसारण वाहिन्यांच्या ई- लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या २३४ शहरांमधे ७३० एफ एम प्रसारण वाहिन्यांच्या ई लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मातृभाषेत स्थानिक विषयांशी संबंधित प्रसारणाला प्रोत्साहन देण्यासाठी हानिर्णय घेतल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या निर्णयामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधे एफ एम वाहिन्यांचं प्रसारण उपलब्ध होईल. यात महाराष्ट्रातल्या ११ शहरांचा समावेश आहे. आकांक्षित जिल्हे आणि नक्षल प्रभावित भागाला या प्रसारणासाठी प्राधान्य देण्यात आलं आहे.