राज्यसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा आज निवडणूक आयोगानं केली. फेब्रुवारी २०२१पासून रिक्त असलेल्या या जागा जम्मू काश्मीर राज्यातून भरावयाच्या आहेत.पंजाबच्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम देखील आयोगानं घोषित केला. ६ ऑक्टोबरला निवडणुकीची अधिसूचना निघेल आणि २४ ऑक्टोबरला मतदान तसंच मतमोजणी होणार आहे.
Site Admin | September 24, 2025 8:25 PM
राज्यसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा