देशात इतर ६ राज्यातल्या प्रत्येकी एका मतदारसंघातल्या तसंच जम्मू आणि काश्मीरमधल्या २ मतदारसंघात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी देखील सुरु आहे.
जम्मूकाश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात भाजपाच्या देवयानी राणा निवडून आल्या आहेत. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी जम्मू काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीचे हर्ष देव सिंग यांचा त्यांनी २४ हजार ६४७ मतांनी पराभव केला.
बडगाममधे जम्मू काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे आगा सईद मुंतजिर मेहदी आघाडीवर आहेत.
मिझोरममधे मिझो नॅशनल फ्रंटचे डॉ. आर लालथंगलियाना निवडून आले आहेत. झोराम पीपल्स मूव्हमेंटचे वनलालसैलोवा यांना त्यांनी ५६२ मतांनी हरवलं.
ओदिशातल्या नुआपाडामधे भाजपाचे जय धोलकिया आघाडीवर आहेत.
तेलंगणात ज्युबिली हिल्स आणि राजस्थानात अंता इथं काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
झारखंडच्या घाटशिलामधे झारखंड मुक्ती मोर्चाचे सोमेशचंद्र सोरेन आघाडीवर आहेत.
पंजाबच्या तरणतारण मतदारसंघात आम आदमी पार्टीचे हरमीत सिंग संधू आघाडीवर आहेत.