डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड निश्चित

 

भाजपाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. देशभरात राज्यसभेच्या १२ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातून खासदार पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांवर पोटनिवडणूक होणार होती. यांच्या बिनविरोध निवडीमुळे केवळ औपचारिकता बाकी आहे. उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसनं नितीन पाटील यांची उमेदवारी आजच घोषित केली, तर भाजपानं काल रायगडचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या दोघांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता.