नागपूर जिल्हा परिषदेच्या १ आणि पंचायत समित्यांच्या ४ जागांसाठी ११ ऑगस्टला पोटनिवडणूक

नागपूर जिल्हा परिषदेच्या एका आणि विविध पंचायत समित्यांच्या चार जागांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, असं राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं.

२३ ते २९ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. ३० जुलै रोजी छाननी होईल. उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचं वाटप ५ ऑगस्टला होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १२ ऑगस्टला होणार आहे.