जालना जिल्ह्यात कैलास बोऱ्हाडे या युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिलं. याप्रकरणी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सर्व गुन्हेगारांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच पालकमंत्री तिथे भेट देतील, असं शिंदे म्हणाले.
राज्यात ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या ७२ पैकी ५४ वसतिगृह वर्षभरातच कार्यान्वित झाली असून उर्वरित वसतिगृह लवकरच सुरू होतील, अशी माहिती इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानपरिषदेत दिली. काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते.