राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. मात्र संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. सरकारनं निलंबन करण्याचं आश्वासन न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला.
Site Admin | March 5, 2025 3:15 PM | Budget Session2025
भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश
