डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

कर्करोगावरची औषधं, दुचाकी, पादत्राणे, कृत्रिम दागिन्यांना करसवलती मिळाल्यानं स्वस्त होणार

अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात कर्करोग, दुर्मिळ आजार आणि इतर गंभीर आजारांवरच्या ३६ औषधांना आयात शुल्कातून पूर्ण माफी दिली आहे. याशिवाय ६ जीवनरक्षक औषधांवरचं ५ टक्के सवलतीच्या दरातून आयात शुल्क द्यावे लागेल. याशिवाय सुरीमी, कॅमेरा तसंच हेडफोनचे सुटे भाग, PCB चे भाग, मोबाइलचे सेन्सर, LED आणि LCD चे भाग, दुचाकी यांच्यावरही आयात शुल्कात सवलत दिल्यानं या वस्तू स्वस्त होतील. मार्बल, ग्रॅनाइट, पादत्राणे, PVC बॅनर, सौर बॅटरी, लोह आणि स्टीलच्या काही वस्तू, स्मार्ट इलेक्ट्रिक मीटर, कृत्रिम दागिने, दुचाकी वाहने यासारख्या वस्तूंवरच्या शुल्कातही कपात झाल्यानं या वस्तू स्वस्त होतील.