डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

July 28, 2025 3:18 PM | BSNL

printer

BSNL ला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिमाहीत २६० तर चौथ्या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा नफा

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडला,२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६०, तर चौथ्या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. बीएसएनएलच्या सहकार्यानं दूरसंचार विभागानं आयोजित केलेल्या दोनपैकी पहिल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. २०२४- २५ या वर्षात कंपनीचा भांडवली खर्च २५ हजार कोटी झाला असून तो आत्तापर्यंतचा सर्वाधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जूनपर्यंत ८ कोटी ५५ लाख असलेली बीएसएनएलची ग्राहकसंख्या आता ९ कोटी झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.