सीमा सुरक्षा दलाच्या पंजाबमधल्या तीन सीमा चौक्यांवर बिटींग द रिट्रीट समारंभ आजपासून पुन्हा सुरू होत आहे. आजचा समारंभ केवळ प्रसारमाध्यमांसाठी असून उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा बिटींग द रिट्रीट समारंभ पंजाबमधल्या अटारी, हुसैनीवावा आणि सादकी या सीमा चौक्यांवर होणार आहे. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी बिटींग रिट्रीट समारंभ स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Site Admin | May 20, 2025 3:30 PM | Border Security Force | Retreat Ceremony
पंजाबमधल्या ३ सीमा चौक्यांवर बिटींग द रिट्रीट समारंभ
