महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना करण्याची बीआरएसचे राज्याचे प्रमुख शंकर धोंडगे यांची घोषणा

भारत राष्ट्र समितीने राज्यात विधानसभा निवडणूक लढवायला नकार दिल्याने पक्षाचा त्याग करून महाराष्ट्र राज्य समिती या नव्या पक्षाची स्थापना करण्याची घोषणा बीआरएसचे राज्याचे प्रमुख शंकर धोंडगे यांनी केली. ते आज नांदेडमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. ५ सप्टेंबर रोजी नांदेडमध्ये ए्मआरएस या पक्षाचं अधिवेशन होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका कार्यसमितीची स्थापना करण्यात आली असून धोंडगे यांची समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. एमआरएस हा पक्ष राज्यात परिवर्तन आघाडीचा घटक  म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं धोंडगे यांनी सांगितलं. या आघाडीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान पक्ष, वामनराव चटप यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.