डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत अनंतजीत सिंग याला स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या जागतिक ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत आज भारताच्या अनंतजीत सिंग याने स्कीट फायनल शॉटगन स्पर्धेत कास्यपदक पटकावलं. तर मैराज खान याला सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.तत्पूर्वी आज महिलांच्या स्कीट फायनलमध्ये गनेमत सेखॉन सहाव्या स्थानापर्यंतच पोहोचू शकली. कालच्या पात्रता फेरीत सेखॉननं 125 पैकी 122 लक्ष्य वेधून राष्ट्रीय विक्रम नोंदवला.आज होणाऱ्या इतर महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये विवान कपूर हा खेळाडू दुपारी 2 वाजता पुरुषांच्या ट्रॅप फायनलमध्ये खेळेल.