डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल हॉकी इंडियाकडून हॉकी संघाला बक्षीस जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं कास्य पदक पटकावलं आहे. काल झालेल्या कास्य पदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. या विजयानंतर भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच विविध केंद्रीय मंत्र्यांनी भारताच्या पुरुष हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे.

 

ऑलिम्पिक मध्ये भारताला कांस्य पदक मिळून दिल्याबद्दल भारताच्या पुरुष हॉकी संघाला हॉकी इंडियाने बक्षीस जाहीर केल आहे. संघातील प्रत्येक खेळाडूला 15 लाख रुपये तर संघाच्या सहकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी साडेसात लाख रुपायांच बक्षीस देण्यात येणार आहे. भारताला ऑलिम्पिक मध्ये 52 वर्षांनी सलग दुसऱ्यांदा कास्य पदक मिळालं आहे.