डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांचा संप

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवासी डॉक्टरांनी सुरक्षेत वाढ आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायद्याची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. महिला आरोग्यसेवकांना सुरक्षित वातावरण देण्याच्या मागणीसाठी या डॉक्टरांनी काल आझाद मैदान इथं मूक मोर्चा काढला. मुंबईतल्या सायन रुग्णालयात मद्यपान केलेला रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना निवासी महिला डॉक्टरशी छेडछाड केल्यानं हा संप पुकारण्यात आला असून याप्रकणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. या छेडछाडीप्रकरणी रुग्णालयाकडून कठोर कारवाई होईपर्यंत हा संप सुरू राहणार असून आपत्कालिन सेवा मात्र सुरू राहणार आहेत.