केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज कर्नाटकातल्या शिवमोग्गा जिल्ह्याच्या सागर तालुक्यातल्या शरावती खाडीवर उभारलेल्या भारतातल्या केबल आधारित दुसऱ्या सर्वाधिक लांबीच्या सिगंदूर पुलाचं उदघाटन केलं. कर्नाटकातल्या सागरा आणि मारकुटीका यांना जोडणारा हा सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा पूल १६ मीटर रुंद असून त्याच्या उभारणीसाठी ४७० कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. १९६० दरम्यान बांधण्यात आलेल्या लिंगानामक्की धरणामुळं उर्वरित कर्नाटकाशी संपर्क तुटलेल्या सागरा तालुक्यातल्या नागरिकांसाठी हा पूल एक वरदान ठरणार आहे.
Site Admin | July 14, 2025 8:18 PM | Bridge Inauguration
भारतातल्या केबल आधारित दुसऱ्या सर्वाधिक लांबीच्या सिगंदूर पुलाचं उदघाटन
