डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा – प्रधानमंत्री

ब्रिक्स देशांनी एकत्र येत दहशतवाद आणि दहशतवादाला रसद पुरवणाऱ्या यंत्रणेशी सामना करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. तसंच या मुद्यांवर दुहेरी निष्ठेला बिलकुल जागा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. रशियामधल्या कझान इथं १६व्या ब्रिक्स परिषदेच्या सत्राला ते संबोधित करत होते. युवकांमध्ये वाढता कट्टरतावाद रोखण्यासाठी पावलं उचलण्याची गरज असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात झालेल्या दहशतवादविरोधी ठरावांवर ठोस काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. 

 

भारत हा युद्धाच्या बाजूने नसून संवादाच्या बाजूने असल्याचं प्रधानमंत्र्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं. महागाई आटोक्यात आणणं, अन्नसुरक्षा, ऊर्जा, आरोग्य हे सर्व देशांसाठी प्राधान्याचे मुद्दे आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले.  ब्रिक्स समूह हा जनहितवादी गट आहे, असा संदेश जगाला दिला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.