July 7, 2025 1:23 PM | BRICS Summit

printer

भारताकडे पुढच्या वर्षी ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद

ब्रिक्स परिषदेचं अध्यक्षपद पुढच्या वर्षी भारताकडे असणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा यंदाच्या परिषदेतला सहभाग आणि ब्राझिल दौरा महत्त्वाचा असल्याचं केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दामू रवी यांनी सांगितलं. ब्राझमल मधे रिओ द जानिरो इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जागतिक पातळीवर काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक, इत्यादी संस्थांचे हात अधिक बळकट करण्याची गरज असल्याचा मुद्दा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या परिषदेत जोरकसपणे मांडला असं रवी म्हणाले.