डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्याप्रती ब्रिक्स नेत्यांची वचनबद्धता

ब्राझीलमध्ये रिओ द जेनेरिओ इथं सुरु असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत, ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शवली. यावेळी सर्व राष्ट्रांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या परिषदेत शांतता आणि सुरक्षितता यावरील सत्राच्या सुरवातीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करुन दहशतवाद हा मानवतेवरची खोल जखम असल्यांचं नमूद केलं. दहशतवादाचा निषेध ही केवळ सोय नाही, ती आपली मूल्यप्रणाली असली पाहिजे, भारत युद्धात नव्हे, तर संवादात विश्वास ठेवतो, असं सांगून मोदी यांनी, गांधी-विवेकानंद-गौतम बुद्धांच्या भारताची भूमिका अधोरेखित केली.