ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. विद्यमान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या विरोधात सत्ता बळकावण्याचा कट रचल्याच्या आरोपांवर सुनावणी सुरू असून, बोल्सोनारो यांनी न्यायालयाच्या अटींचे उल्लंघन केल्याचं आढळून आलं.
बोल्सोनारो यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना ४० वर्षांपर्यंत जन्मठेप होऊ शकते.