ब्राझीलचे उपाध्यक्ष जेराल्ड अलक्मीन तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर

ब्राझीलचे उपाध्यक्ष आणि विकास, व्यापार आणि सेवा मंत्री जेराल्ड अलक्मीन आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर ते उद्या व्यापार मंत्रीस्तरीय आढावा बैठकीत सहभागी होतील. येत्या तीन दिवसांत ते उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन , संरक्षणमंत्री राजनाथ सिंह , परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या भेटी घेणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.