स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या विविध सुरक्षा दलांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना काल उत्कृष्ट सेवेसाठी शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. पोलीस, अग्निशमन, गृहरक्षक दल या विभागातील एक हजार नव्वद कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
महाराष्ट्रातल्या ७ पोलिसांना शौर्य पदक, ३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. अग्निशमन दलातील आठ, गृहरक्षक दलाच्या ५ तर कारागृह सेवेतल्या ८ जणांचा यात समावेश आहे.