लखनौ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण

उत्तरप्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एअरोस्पेस युनिटमधे तयार  झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालं. या युनिटमधे क्षेपणास्त्र निर्मिती ते चाचणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडतात. ब्राह्मोस हे केवळ क्षेेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. ब्राह्मोसमधे अत्याधुनिक प्रणाली असून ते लांबपल्ल्यावर मारा करू शकतं. वेग, अचूकता आणि शक्ती हे याचं वैशिष्ट्य असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले. ब्राह्मोस टीमनं नुकतेच दोन देशांशी चार हजार कोटींचे करार केल्याचंही संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी बूस्टर इमारतीचंही उद्घाटन केलं.