डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब

अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले. त्यामुळं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज चौथ्या दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. 

 

आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी लाच प्रकरणाबाबत गदारोळ सुरु केला. विरोधी पक्षांनी घातलेल्या गोंधळामुळं राज्यसभेचं कामकाज अपेक्षेप्रमाणे होत नसल्यानं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यसभेचं कामकाज ठप्प झाल्यानं वेळेचा अपव्यय तसंच  सामान्य जनतेच्या समस्यांची हेळसांड होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून धनखड यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेच्या अधिवेशनाचं पुढचं सत्र आता २ डिसेंबरला होणार आहे.

 

लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस, डीएमके आणि  समाजवादी पार्टीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. या गदारोळातच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासावरची चर्चा सुरु ठेवली. मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी दाद न दिल्यामुळं बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज आधी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.