August 6, 2025 3:59 PM

printer

संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

विरोधी पक्षानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीनंतर संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.  

 

दुपारच्या सत्रात केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समुद्रातून मालाची वाहतूक विधेयक २०२५ लोकसभेत मांडलं. मात्र विरोधकांच्या गदारोळ सुरु राहिल्यानं सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं. 

 

त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज सकाळी ११ वाजता सुरु झालं तेंव्हा सभापती ओम बिर्ला यांनी हिरोशिमा दिनानिमित्त १९४५ मध्ये जपान देशात झालेल्या अणुबॉम्ब हल्यात मरण पावलेल्याना आदरांजली वाहिली. तसंच, सदनाचे माजी सभापती गुरदयाल सिंग धिल्लो यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली. 

 

राज्यसभेत दुपारच्या सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२५-२६ या वर्षासाठी मणिपूर राज्याच्या अंदाजे खर्च आणि उत्पन्नाचं निवेदन सादर केलं.  मात्र विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सदनाच कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं. 

 

त्यापूर्वी, राज्यसभेत कामकाज सुरु झाल्यावर सर्व सदस्यांनी सदनाचे माजी सदस्य, माजी राज्यपाल दिवंगत सत्यपाल मलिक यांना आदरांजली वाहिली.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.