बॉर्डर गावस्कर क्रिकेट मालिकेत दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी

बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी आहे. पर्थ इथं सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या नाबाद ९० आणि के. एल. राहुलच्या नाबाद ६२ धावांमुळं भारत दुसऱ्या डावात बिनबाद १७२ धावांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १०४ धावात आटोपला. जसप्रीत बुमराहनं पाच गड्यांना तंबूत धाडलं, तर हर्षित राणानं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन गड्यांना बाद केलं. तत्पूर्वी भारताचा पहिला डावही १५० धावांवर गुंडाळला होता. जॉश हेझलवुडनं चार, तर मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मिशेल मार्श यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले होते.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.